Ad will apear here
Next
लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे, सरसेनापतिपदी बिपिन रावत रुजू


नवी दिल्ली :
लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ३१ डिसेंबर रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे. मावळते लष्करप्रमुख बिपिन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांची नियुक्ती आता लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सरसेनापती – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) म्हणून करण्यात आली आहे.

नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८०मध्ये ‘सात सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व त्यांनी केले.

आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील जनरल ऑफिसर इन कमांडिंग, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील लष्करी युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे सांभाळली आहे. युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत नरवणे यांनी काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. 

नरवणे यांचे वडील मुकुंद हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. तर त्यांच्या दिवंगत आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या वृत्तनिवेदक होत्या. मनोज यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

चीनप्रश्नी कामाचा अनुभव
मुकुंद नरवणे यांना चीन सीमाप्रश्नी काम करण्याचा अनुभव आहे. सप्टेंबरमध्ये लेफ्टनंट जनरलपद स्वीकारण्यापूर्वी ते पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्कराच्या पूर्व विभागाकडे चीनसोबत असलेल्या चार किलोमीटर सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. आपल्या ३७ वर्षांच्या कार्यकाळात जनरल नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमध्येदेखील काही काळ सेवा बजावली आहे. ते श्रीलंकेत भारतीय शांती सैनिक दलातही सहभागी होते.

‘सीमेवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज’
‘सरसेनापती हे फक्त पद आहे. तो एकटा काम करू शकत नाही. एकत्र काम केले तरच यश मिळते,’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरसेनापती बिपिन रावत यांनी व्यक्त केली. देशाचे पहिले सरसेनापती (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) म्हणून बिपिन रावत यांना साउथ ब्लॉकमध्ये गॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आले. पाक, चीन सीमेवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचेही ते म्हणाले.

‘जे सैनिक कडाक्याच्या थंडीतही देशसेवा करत आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. देशसेवा करण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांचेही मी अभिनंदन करतो. सर्वांच्या सहकार्याने दिलेली जबाबदारी मी पार पाडली,’ असे रावत यांनी सांगितले. लष्कराची पुनर्रचना व शस्त्रास्त्रांच्या आधुनिकीकरणावर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी सरसेनापतिपद निर्माण करण्यात आले आहे. त्या पदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा आहे. सरसेनापती हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतील. या पदाच्या निर्मितीला गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZZACI
Similar Posts
लष्करावरही आता मराठमोळा ठसा! लष्करप्रमुखपद, सरन्यायाधीश आदी पदं ही जात, धर्म, वंश, लिंग यापेक्षा वेगळी असतात. या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींची सेवाज्येष्ठता पाहिली जात असली, तरी तिथपर्यंत पोहोचणं हे काही फक्त वयावर होत नसतं. तिथपर्यंत कर्तृत्वानंच पोहोचता येतं. नुकतीच ले. जनरल मनोज नरवणे यांची लष्करप्रमुखपदी निवड झाली. लष्करप्रमुखपदी
देशाला लाभणार पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सुरक्षाविषयक कॅबिनेट कमिटीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे (सीडीएस) नवे पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशाला प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात चीफ ऑफ
७० लाखांचे पॅकेज नाकारून इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी सुरू करणारा जिगरबाज अली उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली
अनंत आमुची ध्येयासक्ती..! ‘चांद्रयान-तीन’ला मंजुरी; ‘इस्रो’ची तयारी सुरू नवी दिल्ली : ‘चांद्रयान-दोन’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे यशस्वीरीत्या लँडिंग करता न आल्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि देशवासीयांना मोठा धक्का बसला होता; मात्र या अपयशातून सावरत आता ‘इस्रो’ने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्याची मोहीम हाती घेतली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language